Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी साकारले आॅनस्क्रीन डॅड्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:39 IST

अबोली कुलकर्णीबॉलिवूडचे ‘ए’ लिस्टर्स अभिनेते आता ‘चार्मिंग अभिनेता’ या चौकटीबाहेर पडून काहीतरी हटके करण्याच्या विचारात आहेत. वाढत्या वयानुसार ...

अबोली कुलकर्णीबॉलिवूडचे ‘ए’ लिस्टर्स अभिनेते आता ‘चार्मिंग अभिनेता’ या चौकटीबाहेर पडून काहीतरी हटके करण्याच्या विचारात आहेत. वाढत्या वयानुसार आता या बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांनी वयस्क भूमिका करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आता हेच पाहा ना, सलमान खान हा जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबतच्या एका चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार असून शाहरूख खाननेही वडिलांच्या व्यक्तिरेखेतील चित्रपट साईन केल्याचे कळतेय. चला तर मग जाणून घेऊयात, बॉलिवूडमधील असे काही ‘ए’ लिस्टर्स अभिनेते ज्यांनी आॅनस्क्रीन वडिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. आमिर खान (५५ वय)बॉक्स आॅफिसवर अलीकडेच भरपूर गल्ला जमवलेला चित्रपट म्हणजे ‘दंगल’. ‘सुल्तान’ चित्रपटाचेही रेकॉर्ड ब्रेक करत दंगलने परदेशातही कमाई केली. खºया आयुष्यात तो एक जबाबदार पिता असून या चित्रपटातही त्याने चार मुलींच्या वडिलांची भूमिका केली आहे. ही भूमिका आमिर खानने अत्यंत जबाबदारीने उत्तमप्रकारे निभावली आहे. त्यासाठी त्याने हवी ती सगळी मेहनत घेतली आहे. त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही, आमिर खानने आॅनस्क्रीन डॅडच्या व्यक्तीरेखेला खरंच न्याय दिला आहे. अजय देवगन (४६ वय)‘बॉलिवूडचा सिंघम’ अजय देवगन याने ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ ,‘सिंघम रिटर्न्स’ अशा अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर त्याने वडिलांची भूमिका साकारलेला चित्रपट म्हणजे ‘दृश्यम’. या चित्रपटाची खुप चर्चा झाली. यात त्याने दोन मुलींच्या वडिलांची भूमिका केली आहे. इमोशनल थ्रिलर असलेल्या या चित्रपटात श्रिया सरन या दाक्षिणात्य अभिनेत्रीने त्याची आॅनस्क्रीन पत्नी म्हणून उत्तम साथ दिली आहे.अनिल कपूर (५८ वय)‘बॉलिवूडचा मिस्टर इंडिया’ अनिल कपूर हा सध्या ‘मुबारकाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अर्जुन कपूर या दुहेरी व्यक्तीरेखेच्या भाच्यांच्या काकाच्या भूमिकेत दिसतो आहे. अनिल क पूर हा एक व्हर्सेटाईल अभिनेता असून त्याने देखील आॅनस्क्र ीन वडिलांची भूमिका साकारली आहे. ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात अनिल कपूरने प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्या वडिलांची भूमिका केली आहे. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले. सनी देओल (५८ वय)‘ढाई किलो का हाथ ’ हा फेमस डायलॉग आठवतोय ना? सनी देओलचा हा डायलॉग बॉलिवूडच्या फेमस डायलॉगपैकी एक मानला जातो. त्याने आजपर्यंत अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या. त्याने ‘सिंग साब दी ग्रेट’ या चित्रपटात १९ वर्षाच्या उर्वषी रौतेलासोबत रोमान्स केला होता. तर ‘घायल’ या चित्रपटात त्याने वडिलांची भूमिका केली आहे. यातील त्याचा अभिनय हा नक्कीच प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडला होता. जॅकी श्रॉफ (५८ वय)‘बॉलिवूडचा जॅकी दादा’ म्हणून आपण जॅकी श्रॉफला ओळखतो. त्याने अ‍ॅक्शन, रोमँटिक, खलनायकी सर्व भूमिका साकारल्या. त्याने वडिलांचीही भूमिका साकारली. त्याने करण मल्होत्रा यांच्या ‘ब्रदर्स’ मध्ये अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली. तसेच ‘सौदागर’मध्ये त्याने मनिषा कोईराला हिची भूमिका देखील उत्तमरित्या साकारली आहे.