Join us

​इमरान खान अ‍ॅक्टिंग सोडून करणार हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 19:41 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इमरान खानचा चित्रपट येऊन बरेच दिवस झाले आहे. आगामी चित्रपटात तो कोणत्या भूमिकेत ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इमरान खानचा चित्रपट येऊन बरेच दिवस झाले आहे. आगामी चित्रपटात तो कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्न जर त्याच्या चाहत्यांना पडला असेल तर ही बातमी त्यांच्यासाठीच आहे. इमरान खान आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत असून यावेळी तो अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसेल. अभिनेता इमरान खान याने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून धमाकेदार सुरुवात केली होती. मात्र पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्याचा शेवटचा चित्रपट २०१५ साली आलेला कट्टी बट्टी हा होता, यात कंगना राणौतने मुख्य भूमिका केली होती. सध्या इमरान खानकडे कोणताही चित्रपट नाही असे सांगण्यात येते. याचमुळे त्याने दिग्दर्शनाकडे वाटचाल सुरू केली असल्याचे मानत जात आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार इमरान आपल्या दिग्दर्शनात तयार होणाºया पहिल्या चित्रपटाच्या लेखनात व्यस्त आहे. या चित्रपटाची पटकथा लेखनाची जबाबदारी आयशा दीवित्रे हिच्यावर सोपविली आहे. Read More : इमरान खानला आता तरी मिळणार का काम?आयशाने ‘ये जवानी है दिवानी’ व इमरान खानचा पहिला चित्रपट ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. इमरानचा पहिला चित्रपट लव्ह स्टोरी असेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाने नाव अद्याप ठरलेले नाही. यात दिग्दर्शक म्हणून इमरान डेब्यू करणार असून यात दोन नवे चेहºयांना संधी देण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येते. यामुळे हा चित्रपट डायरेक्टर सह अ‍ॅक्टर अ‍ॅक्ट्रेस यांचाही डेब्यू करणारा ठरला. Read More : ‘रिल लाईफ’ मुली फातिमा आणि सान्या यांना आमिर खान का देतोय पियानोचे धडे?दरम्यान काही दिवसांपूर्वी इमरान पुन्हा एकदा पडद्यावर परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मामी फेस्टिव्हल दरम्यान आमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटाला २५ वर्षे झाल्याची पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी इमरानने हजेरी लावली होती. ‘जो जिता वही सिकंदर’मध्ये त्याने एक भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील देवेश भोजानी हा देखील आता डायरेक्टर झाला आहे. त्याच्याकडून इमरानला मार्गदर्शन मिळालेच असेल. म्हणूनच इमरान या वर्षाच्या अखेरपर्यंत डायरेक्टरच्या खुर्चीत विराजमान झालेला दिसू शकतो. ALSO READ हॉलिवूडसाठी काम करण्यात का नाही आमिर खानला रस? जाणून घेण्यासाठी वाचा...‘त्या’ टीकेला दिले आमिर खानने उत्तर; वाचा काय म्हणाला तो...