Join us  

Sushant Singh Rajput birth anniversary: तू माझा आजही हिस्सा आहेस म्हणत सुशांत सिंग रजपूतच्या बहिणीने शेअर केली भावुक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:47 AM

सुशांतची बहीण श्वेता सिंगने त्याचे काही फोटो कोलाज करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ठळक मुद्देया फोटोंसोबत श्वेताने लिहिले आहे की, लव्ह यू भाई... तू माझा आजही हिस्सा आहेस आणि कायम राहशील...

सुशांत सिंग राजपूत सारखा एक उमदा स्टार काही महिन्यांपूर्वी या जगाला अलविदा म्हणत निघून गेला. पण त्याच्या खास चाहत्यांच्या मनात तो आजही जिवंत आहे. त्याचे चाहत्यांच्या मनातील स्थान अढळ आहे आणि राहील. सुशांतच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना तर चांगलाच धक्का बसला आहे. सुशांत आज हृयात असता तर आज तो ३५ वर्षांचा झाला असता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांतच्या बहिणीने एक भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

सुशांतची बहीण श्वेता सिंगने त्याचे काही फोटो कोलाज करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लहानपणीचा सुशांत, तसेच सुशांतचे त्याच्या कुटुंबियांसोबतचे काही फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फोटोंसोबत श्वेताने लिहिले आहे की, लव्ह यू भाई... तू माझा आजही हिस्सा आहेस आणि कायम राहशील...

श्वेताची ही पोस्ट सुशांतच्या चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. काहीच तासांत एक लाखाहून अधिक लाइक्स या पोस्टला मिळाले आहेत. श्वेताने सुशांतसाठी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुशांतचे एक स्वप्न लवकरच पूर्ण  होणार असल्याचे लिहिले आहे. एस्ट्रोफिजिक्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्याला सुशांत सिंह रजपूत मेमोरियल फंडाकडून ३५०० डॉलर दिले जातील. हॅपी बर्थडे मेरे भाई... खुश राहा... 

३४ वर्षीय सुशांत गेल्या १४ जूनला त्याच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतचा मृत्यू कशाने झाला, याचा तपास अद्यापही सुरू आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा यंत्रणांचा तपास सुरुच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रियाने सुशांतचा पैसा हडपला, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत