Join us  

मुंबईकर पावसाने त्रासले अन् मीरा राजपूत ‘बिंदी बम्प’ने! वाचा, काय आहे ‘बिंदी बम्प’ नावाची भानगड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:30 PM

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीशी संबंधित प्रत्येक भावना सध्या ती आपल्या सोशल अकाऊंटवर व्यक्त करतेय. 

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीशी संबंधित प्रत्येक भावना सध्या ती आपल्या सोशल अकाऊंटवर व्यक्त करतेय. पण आता मीराने आपल्या ‘बेबी बम्प’चा नाही तर आपल्या ‘बिंदी बम्प’चा उल्लेख केला आहे. आता हे ‘बिंदी बम्प’ काय भानगड आहे, हे तर जाणून घ्यायलाच हवे.तर मीराने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात माथ्यावर तिथे टिकली लावतात, तिथे मीराला एक पिंपल झालाय. विशेष म्हणजे, हा पिंपल जाता जात नाहीये. मीरा यामुळे वैतागलीयं हे नव्याने सांगायला नकोच. म्हणूनच this weird bindi bump refuses to go असे कॅप्शन तिने दिले आहे.

 एकंदर काय तर हा ‘बिंदी बम्प’ मीरासाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरतोय. एकीकडे मुंबईकर पावसामुळे त्रस्त आहेत अन् दुसरीकडे शाहिदची बेटरहाफ एका पिंपलने त्रासली आहे.यापूर्वी मीराने तिला शेजवान चीज डोसा व पिझ्झा खायची इच्छा होत असल्याचे सोशल मीडियावर शेअर केले होते. ७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. मीशा आता उणीपुरी दीड वर्षांची आहे आणि आता मीरा पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती़ म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय.

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडसोशल मीडिया