या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 15:49 IST
यात तर काही शंका नाही की, संजय दत्तच्या जीवनावर राजकुमार हिराणी बनवत असलेल्या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत ...
या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष
यात तर काही शंका नाही की, संजय दत्तच्या जीवनावर राजकुमार हिराणी बनवत असलेल्या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर संजूबाबाची ‘बॅड बॉय’ इमेज कशी साकारणार याचीसुद्धा खूप उत्सुकता आहे.या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्तच्या वरच्या वर भेटीगाठी होत आहेत. रणबीर, हिराणी, संजयची पत्नी मान्यता, विकी कौशल आणि संजयचे अनेक फोटो इंटरनेटवर फिरत आहेत.परंतु यामुळे संजय पुरता वैतागला आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्याने सांगितले की, ‘राजूला माझे जीवन इंटरेस्टिंग वाटले असावे म्हणून त्याने त्यावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. रणबीर माझी भूमिका करतोय पण त्याची एक अट माझ्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. तो मला रोज फोन करतो, माझ्यासोबत दिवसभर राहण्याची मागणी करतो. मी तर कोणासोबत अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही राहू शकत. त्यामुळे मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. हा रोल त्याच्यासाठी अवघड आहे.’ बायोपिक इन प्रोग्रेस : राजकुमार हिराणी आणि संजय दत्तयावेळी त्याची बहीण प्रियांका आणि पूर्व अभिनेत्री पूजा भट्टदेखील त्याच्यासोबत होत्या. पूजा म्हणाली की, ‘रणबीरने एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की, अशा प्रकारे तो संजय दत्त नाही होऊ शकत. संजयमध्ये असणार निडरपणा, खुले व्यक्तीमत्त्व केवळ त्याच्यासोबत राहून तो मिळवू नाही शकत. आजचे कलाकार त्यांच्या प्रवक्त्याच्या मर्जीशिवाय एक शब्द बोलत नाही. संयजसारखे मनाचा राजा होणे सोपी गोष्ट नाही. तो (रणबीर) एक चांगला अभिनेता आहे पण त्याला केवळ संजूसोबत वेळ घालवून नाही तर वेगळ्या प्रकारे तयारी करावी लागेल.’चित्रपटाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नसून विविध कारणांमुळे हा चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यत्यय येतोय.