Join us

मुलीला मिळालेल्या अपयशामुळे कॅमेऱ्यापासून दूर गेली ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 10:57 IST

माला सिन्हा यांचा आज 81वा वाढदिवस आहे. 80चे दशक माला सिन्हा यांनी गाजवले होते. माला सिन्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ...

माला सिन्हा यांचा आज 81वा वाढदिवस आहे. 80चे दशक माला सिन्हा यांनी गाजवले होते. माला सिन्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे ज्यांच्या सौदर्यां बरोबर त्यांच्या अभिनय ही तेवढाच दमदार होता. 80च्या दशकात माला सिन्हा या हजारोंच्या मनावर राज करायच्या.  तब्बल पाच दशक त्यांनी चित्रपटात काम केले.  माला सिन्हा यांचा जन्म नेपाळमध्ये झाला. माला यांचे वडील अल्बर्ट सिन्हा बंगालचे होते तर आई नेपाळच्या होत्या. त्यामुळे त्यांना नेपाळी भारतीय म्हणायचे. माला यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव बेबी ठेवलो होते मात्र ते माल यांना न आवडल्याने त्यांनी ते बदलून माला सिन्हा केले. माला यांनी बंगाली चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एकदा त्या चित्रपटाच्या कामासाठी मुंबईत आल्या होत्या त्यावेळी त्यांची भेट गीता बाली यांच्याशी झाली. गीता बाली यांनी माला यांची ओळख दिग्दर्शक केदार शर्मा यांच्यासोबत करुन दिली. केदार शर्मा यांनी माला सिन्हा यांची निवड रंगीन रातें या चित्रपटासाठी केली. असे म्हटले जाते माला सिन्हा यांच्या यशात केदार शर्मा यांची सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी माला यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा एका निर्मात्यांने त्यांना म्हटले होते की आरशात जाऊन चेहरा बघा. माला या गोष्टीला कधीच विसरु शकले नाही. चित्रपटात काम करण्याच्या आधी माला रेडिओवर गायच्या.  प्यासा या चित्रपटाने माला सिन्हाना यांचे नशीब बदलले. माला यांच्या घरी कामा करायला बाई नव्हती. त्यामुळे शूटिंगनंतर घरी गेल्यावर त्या स्वत: किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायच्या. माला यांच्या घरी एकदा इनक्म टॅक्सवाल्यांनी छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्या बाथरुम मधल्या भिंतीमधून 12 लाखांची रक्कम मिळाली होती. मला यांच्या पतीचे नाव चिदंबर प्रसाद लोहानी होते. माल सिन्हा यांनी एक मुलगी देखील आहे आणि तिचे नाव प्रतिभा आहे. प्रतिभाला मोठा गाजावाज करत बॉलिवूडमध्ये लाँच करण्यात आले. मात्र तिचा चित्रपट फ्लॉप झाला.  मुलीचे अपयश त्या पचवू शकल्या नाही. त्यानंतर त्यांनी पार्ट्ंयाच्या ठिकाणी जाणं बंद केले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कॅमेऱ्यासमोर आल्याच नाहीत. तसेच त्या लाईमलाईटपासून ही खूप दूर निघून गेल्या.