जॅकी चॅनसोबत थिरकली दिशा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:13 IST
बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ टायगर श्रॉफ याची गर्लफ्रेंड दिशा पाटनी हिची ओळख करून देण्याची गरज आहे का? नाही ना. तिच्यासोबत ...
जॅकी चॅनसोबत थिरकली दिशा!
बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ टायगर श्रॉफ याची गर्लफ्रेंड दिशा पाटनी हिची ओळख करून देण्याची गरज आहे का? नाही ना. तिच्यासोबत टायगरने ‘बेफिक्रा’ हे गाणं शूट केलं आणि क्षणार्धात तिच्याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली. ‘लोफर’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगवेळी जोधपूरच्या किल्ल्यात तिचा अॅक्टिंग डेब्यू झाला. तब्बल दोन वर्षांनंतर ती आता परतलीय ते पण मास्टर जॅकी चॅनसोबत. होय.‘कुंग फु योगा’ चित्रपटात ती आंतरराष्ट्रीय डेब्यू करणार आहे. तिला चित्रपटात जॅकीसोबत डान्स करण्याची संधी मिळालीय. चित्रपटाविषयीचे मजेदार किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना ती म्हणते, ‘चिनी लोकांना कपडे आणि डान्स प्रचंड आवडतो. तुम्ही चित्रपटाच्या शेवटी टीममधील सदस्य ठुमका लावताना पाहू शकाल. भारतीय को-स्टार्स सोनू सूद आणि अमीरा दस्तूर तर चिनी कलाकार जॅकी चॅन आणि मिया हे देखील यात दिसतील. मिया ही योगा शिक्षक असून, ती भारतात थोडे दिवस येणार ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. जॅकीचे चित्रपट हे रोमँटिक नसतात. पण तरीही तुम्ही जॅकी आणि माझ्या कॅरेक्टरमधील रोमँटिक क्षण अनुभवू शकाल. जॅकीला भारतीय गाण्यांची आवड मी लावली. त्यामुळे तो शूटिंगवेळीही ते गाणे लावून बसायचा. त्याने एक सीडीच विकत आणली होती.’ दिशा पाटनी चित्रपटात मार्शल आर्ट्स करताना दिसेल. अॅक्शन, जिम्नॅस्टिक्स यावरही काही सीन्स शूट करण्यात आले आहेत. जॅकीसोबत काम करण्याची संधी तिला मिळालीय. करिअरच्या सुरूवातीलाच तिला आंतरराष्ट्रीय कलाकारासोबत काम करायला मिळाल्याने अनेक संधी तिला मिळतील, अशी आशा आहे.