Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलाइका अरोराने परिधान केला असा ड्रेस, ज्याचे ब्रिटनच्या राजकुमारीशी जुळले कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 15:50 IST

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसेसमुळे चर्चेत असते. खरं तर मलाइका सुरुवातीपासूनच आपले कपडे ...

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसेसमुळे चर्चेत असते. खरं तर मलाइका सुरुवातीपासूनच आपले कपडे आणि स्टाइल स्टेटमेंटसाठीच इंडस्ट्रीत ओळखले जाते. मलाइकाने कोणत्याही इव्हेंटमध्ये हजेरी लावली की, तिच्या ड्रेसवरून चर्चा रंगायला लागते. ती नेहमीच काही तरी परिधान करून चारचौघांमध्ये हजेरी लावणे पसंत करते. त्यामुळे मलाइका सार्वजनिक ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळून राहतात. यावेळेस तिने एका इव्हेंटसाठी ड्रेस परिधान केला. मात्र या ड्रेसबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

मलाइका कपड्यांबरोबर आपल्या फिगरवरही अधिक लक्ष केंद्रित करीत असते. त्यासाठी ती नित्यनियमाने जिमाला जाणे पसंत करते. असो, मलाइकाने नुकताच असा एक ड्रेस परिधात केला होता, ज्याची किंमत वाचून तुम्ही दंग राहाल. तिने गुचीचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. हा ब्लॅक आणि ग्रे पॅटर्नचा शॉर्ट ड्रेस होता. वृत्तानुसार या ड्रेसची किंमत सुमारे १ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. 



तुमच्या माहितीसाठी मलाइकाने परिधान केलेल्या ड्रेसप्रमाणेच ब्रिटनची राजकुमारी केट मिडिलटनने असा ड्रेस परिधान केला होता. राजकुमारीने हा महागडा ड्रेस गेल्यावर्षी परिधान केला होता. मलाइका नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. त्याशिवाय ती सोशल मीडियावरही जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. मलाइकाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. 



मलाइका काही काळापूर्वीच एमटीव्हीच्या इंडियास नेक्स्ट टॉप मॉडेल सीजन-३ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. या शोदरम्यान ती तिच्या ड्रेसमुळे सातत्याने चर्चेत राहिली. याव्यतिरिक्त मलाइकाने काही काळापूर्वीच एक प्रसिद्ध मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. तेव्हा तिच्या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा रंगली होती.