ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:25 IST
ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्या दिवाळी मध्ये आजीं झाली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे .आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ...
ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा आनंद गगनात मावेना
ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्या दिवाळी मध्ये आजीं झाली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे .आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अभिनेत्री इशा देओल ने गोंडस मुलीला जन्म दिला आहे काही वेळा पूर्वीच ह्या बाळाचा नामकरण विधी पार पडला हो इशा देओल च्या ह्या मुलीचे नाव 'राध्या' असे ठेवण्यात आले आहे. खरंतर इशा आणि तिचा पती भरत ह्यांनी आधीच आपल्या होणाऱ्या बाळाचे नाव ठरवले होते त्यांना फक्त घरीं जाऊन आपल्या बाळाचे नाव जाहीर करायचे होते तसे बघायला गेलं तर इशा ने आपल्या मुलीचे नाव फार छान ठेवले आहे ना? एवढेंच नाही तर इशा आणि भरत ने राध्या च्या रूम ची पण सजावट आधीच करून ठेवली आहे मिळालेल्या माहितीनुसार ह्या रूम ची थीम नेचर संबंधित ठेवली आहे मुंबईत खार येथे इशा ची नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यानंतर ईशा आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थीत आहे राध्या च्या जन्माच्या वेळेस हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे दोघे ही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते एक मुलाखतीत हेमा मालिनी ने सांगितले की मिनफर खुश आहे आणि आणि राध्या चे आजोबा म्हणजेच धर्मेंद्र ह्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. हेमा मालिनी आणि इशा देओलच्या सासू ने राध्या साठी भरपूर शॉपिंग केली आहे तुम्हाला सांगू इच्छितो की हेमा मालिनी ने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला त्यावेळेस त्यांनी आपले आत्मचरित्र चे पुस्तक सुद्धा लाँच केले . हेमा मालिनी ची लहान मुलगी अहाना ला एक मुलगा आहे त्याचे नाव डेरीयन आहे आता डेरियन ला त्याच्या बरोबर खेळायला एक बहिण मिळाली आहे.ईशाने ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आॅँखे आणि कॅश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ईशाने इंडस्ट्रीत राहण्यास फारसा उत्साह दाखविला नाही. ती २०१५ मध्ये कन्नड चित्रपट ‘केअर आॅफ फुटपाथ’मध्ये पाहावयास मिळाली होती.