Join us  

बालपणीच्या मैत्रिणीमुळे अनन्याच्या हातून जाणार Dream Girl 3?; 'या' अभिनेत्रीची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:55 PM

Ananya pandey: अनन्या या सिनेमात लीड रोलमध्ये झळकणार आहे. मात्र, आता एक लोकप्रिय अभिनेत्री तिला रिप्लेस करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (ayushmann khurrana) याचा ड्रीम गर्ल आणि ड्रीम गर्ल 2 हे दोन्ही सिनेमा प्रचंड गाजले. त्यामुळेच या फ्रेंचाइजीमधील ड्रीम गर्ल 3 ची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या पार्टमध्ये आयुषमानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha)  आणि अनन्या पांडे या दोघीही स्क्रीन शेअर करणार आहेत. मात्र, या सिनेमाविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे. या सिनेमातून अनन्या पांडेचा (ananya pandey) पत्ता कट होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर अनन्याच्या बेस्टफ्रेंडमुळेच तिला या सिनेमातून बाहेर जावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सारा अली खान (sara ali khan) आणि अनन्या पांडे या दोघींच्या मैत्रीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. लहानपणीपासून या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र, 'ड्रीम गर्ल 3' मध्ये सारा अली खान, अनन्याला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आयुषमान खुराना आणि सारा अली खान या दोघांनी ड्रीम गर्ल 3 च्या मेकर्सची भेट घेतली. त्यामुळे या सिनेमातून अनन्याचा पत्ता कट होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सिनेमाच्या मेकर्सने अद्यापतरी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघी बेस्टफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. लहानपणीपासून त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' मध्येदेखील या दोघी एकत्र सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले होते.

दरम्यान, आयुषमानचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या सिनेमात आयुषमानसोबत अनन्या पांडे, परेश रावल, विजय राज, असरानी, राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकले होते.

टॅग्स :बॉलिवूडअनन्या पांडेसारा अली खानआयुषमान खुराणानुसरत भारूचा