Join us

आर्यनने शाहरूख खानचे पूर्ण केले हे स्वप्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 13:43 IST

काही दिवसांपूर्वीच किंगखान शाहरूखच्या लेकीने शाहरूखची एक सवय आवडत नसल्याचे म्हटले होते.परफेक्ट शॉट मिळत नाही तोपर्यंत शाहरूख शूट करत ...

काही दिवसांपूर्वीच किंगखान शाहरूखच्या लेकीने शाहरूखची एक सवय आवडत नसल्याचे म्हटले होते.परफेक्ट शॉट मिळत नाही तोपर्यंत शाहरूख शूट करत असतो ही सवय सुहानाला आजिबात आवडत नसल्याचे तिने म्हटले होते.आता सुहाना नंतर शाहरूखला एक गोष्ट बिल्कुल जमत नसल्याचे समोर आले आहे. सुहानानंतर आर्यननेही शाहरूखच्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.रोमान्सचा बादशहा समजला जाणा-या शाहरूखला एक गोष्ट काहीही केले तरी नीट जमत नाही,शाहरूखला गिटार वाजवण्याची आवड आहे.मात्र त्याला गिटार वाजवताच येत नाही. त्यामुळेच की काय,पापा शाहरूखचा हा छंद आपलासा करत आर्यन गिटार वाजवायला शिकला. आर्यन खुप सुंदर गिटार वाजवतो त्यामुळे माझी मुलं एक पाऊल पुढे असल्याचे खुद्द शाहरूखनेच म्हटले आहे. आर्यनच्या रूपात शाहरूखने स्वत:चा गिटार वाजवण्याचा हा छंद जोपासल्याचे खुद्द शाहरूखनेच म्हटले आहे.त्याने अनेकवेळा गिटार शिकण्याचा प्रयत्नही केला पण त्याच्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळालं नाही. शाहरुखचं हे स्वप्न मात्र त्याच्या मुलाने म्हणजे आर्यनने पूर्ण केले आहे.आर्यनला फार सुंदर गिटार वाजवता येते. आर्यनला गिटार वाजवताना बघून शाहरुखला फार आनंद होतो. जे आपण नाही करू शकलो ते आपला मुलगा करतोय हे पाहून खूप आनंद होत असल्याचे शाहरूख सांगतो.