आई, वडिल आणि गर्भातील बाळ दर्शवणारा सोफियाने शेअर केलेला हा सांकेतिक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दुस-या फोटोत तर सोफियाने प्रेग्नंट असल्याचे जणू कन्फर्म केले आहे.The age of knowing..the star is inside the Mother Earth radiating out her light..the brightest star in the universe is here,असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
ALSO READ : सोफिया हयातने पोस्ट केला हनिमूनचा व्हिडिओ युजर्सने म्हटले बहन तुम तो नन थी ना...
गतवर्षी एप्रिलमध्ये हयात हिने रोमानियामधील इंटेरियर डिझायनर व्लाड स्टॅनेस्कूसोबत अतिशय शाही पद्धतीने विवाह रचला होता. दोन वर्षांपूर्वी सोफियाने अचानकपणे नन बनल्याची घोषणा केली होती. ज्यामुळे तिने तिचे सिलिकॉन ब्रेस्टही रिमूव केले होते. रिलेशनशिपमध्ये त्रास सहन केल्यानंतरच मी नन बनण्याचा निर्णय घेतला, असे तिने सांगितले होते. केवळ इतकेच नाही तर आयुष्यात कधीही लग्न, सेक्स आणि मुलांना जन्म देणार नसल्याचेही जाहीरपणे सांगितले होते. पण यानंतर अचानक सोफिया पलटली आणि पुढे संसार थाटून मोकळी झाली. आता तर तिला बाळाची चाहुल लागली आहे.