‘कथथी’ रिमेकमध्ये अक्षयचा डबल रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 10:23 IST
तमीळ चित्रपट ‘कथथी’ च्या हिंदी रिमेकसाठी ‘हॉलीडे’ स्टार अक्षय कुमार दिग्दर्शक ए.आर.मुरूगादोससोबत एकत्र आला आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय याच्या ...
‘कथथी’ रिमेकमध्ये अक्षयचा डबल रोल
तमीळ चित्रपट ‘कथथी’ च्या हिंदी रिमेकसाठी ‘हॉलीडे’ स्टार अक्षय कुमार दिग्दर्शक ए.आर.मुरूगादोससोबत एकत्र आला आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय याच्या मुख्य भूमिकेतील ‘थुपक्की’ चित्रपटाविषयी हिंदी रिमेकची चर्चा सुरू आहे.‘कथथ्थी’ मध्ये विजयने दुहेरी भूमिका केली असून एक म्हणजे चोर आणि दुसरे म्हणजे पदवीधर कम्युनिस्ट विचारप्रणालीच्या व्यक्तीची. ‘मुरूगादोस हे नॉर्थ इंडियन सेटअपमध्ये चित्रपटाची स्क्रिप्टिंग करत असून अक्षय दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. कॉर्पाेरेट एनरॉयमेंट मुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत या समस्येवर चित्रपटाचे कथानक फिरते. ‘इक्का’ या नावाने हा रिमेक प्रदर्शित होईल.दोन महिने चित्रपटाचे शेड्यूल बनवण्यात आले आहे. हे कथानक कोलकाता, चैन्नई, मुंबई आणि बँकॉक येथून शूट होणार आहे. तर बाकी सर्व चैन्नईत शूट होईल.