Join us

शाहरुख खानच्या ५८व्या वाढदिवसाला डबल धमाका! ग्रॅण्ड पार्टी, अन् SRK फॅन्ससोबत पाहणार 'डंकी'चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 10:39 IST

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे. किंग खान ५८ वर्षांचा होईल.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे. त्या दिवशी किंग खान ५८ वर्षांचा होईल. हा वाढदिवस खास आणि कायमचा अविस्मरणीय बनवण्यासाठी शाहरुख खानने विस्तृत योजना आखल्या आहेत. यावेळी शाहरुख त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी बर्थडे पार्टी देणार आहे, ज्यासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी एकत्र बर्थडे पार्टीचे आयोजन करणार असल्याचे बोलले जात आहे. पूजा ददलानीचा ४० वा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्याच्या ५८ व्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. सूत्राने सांगितले की, २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खूप खास ठरले आहे. यावर्षी त्याने 'पठाण' आणि 'जवान' या दोन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि आता 'डंकी' देखील रिलीजसाठी सज्ज आहे. म्हणूनच शाहरुखला त्याचा वाढदिवस संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसोबत धडाक्यात साजरा करायचा आहे.

शाहरुखच्या वाढदिवसाची पार्टी होणार या ठिकाणीरिपोर्टनुसार, करण जोहर, आलिया भट, दीपिका पादुकोण, एटली, राजकुमार हिरानी आणि काजोल शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ शकतात. सलमान खानही या पार्टीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. शाहरुखची बर्थडे पार्टी बीकेसी, वांद्रे येथे होणार आहे.

२ नोव्हेंबरला 'डंकी'चा टीझर येणार भेटीलासूत्रांनी सांगितले की, शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाचा टीझर २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यानंतर एक कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये शाहरुख चाहत्यांसोबत चित्रपटाचा टीझर लाइव्ह पाहणार आहे. हे ते चाहते आहेत जे देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुखला भेटायला येणार आहेत. यानंतर तो मन्नतमध्ये आलेल्या चाहत्यांना भेटेल आणि रात्रीच्या भव्य पार्टीचा भाग असतील.

टॅग्स :शाहरुख खान