डोनाल्ड ट्रम यांच्या शपथविधी सोहळ्यात परफॉर्म करणार मनस्वी ममगई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 11:40 IST
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारतीय अभिनेत्री मनस्वी ममगई परफॉर्म करणार आहे. मनस्वीने 30 लोकांच्या ग्रुपमध्ये ...
डोनाल्ड ट्रम यांच्या शपथविधी सोहळ्यात परफॉर्म करणार मनस्वी ममगई
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारतीय अभिनेत्री मनस्वी ममगई परफॉर्म करणार आहे. मनस्वीने 30 लोकांच्या ग्रुपमध्ये बॉलिवूड डान्सवर परफॉर्म करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या 'थँक यू रॅली'मध्ये मनस्वी सहभागी होती. या डान्स परफॉर्मन्स सुरेश मुकुंद यांनी कोरियोग्राफ केला आहे. मनस्वीच्या ग्रुपला 7 मिनिटांचा स्लॉट देण्यात आला आहेत. यात ते चष्मा, धूम मचाले, जुम्मे की रात है आणि जय हो या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत. अजय देवगनसोबत एक्शन जैक्सन याचित्रपटाच्या माध्यमातून मनस्वीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मनस्वीने 2010 मध्य़े मिस इंडिया प्रतियोगिता जिंकली होती. याआधी 2008मध्ये टूरिझम इंटरनॅशनचा किताब पण तिने पटकावला होता. मनस्वीचा जन्म दिल्ली झाला आणि तिचे कुटुंबीय मुळाचे उत्तराखंडमधले आहे. मनस्वी अनेक मोठ्या ब्रॉन्ड्ससाठी कॅम्पिनंग केले आहे. ट्रम्प भारतासाठी अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात चांगले राष्ट्राध्यक्ष असतील. कारण त्यांनी आतापर्यंत भारताला नेहमीच पाठिंबा दिलाय, असं मनस्वीने म्हटले आहे. शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आपण उत्सुक असल्याचेही तिने सांगितले.ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात जवळपास 1200 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे समजतेय..