Join us

​‘डॉन ३’मध्ये शाहरुखला नकोय प्रियंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 11:00 IST

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे सर्व अभिनेत्र्यांबरोबर माधुर्याचे संबंध आहे. त्यामुळे निर्मात्यांना त्याच्यासोबत हीरोईनला कास्ट करताना कोणत्याच अडचणी येत नाहीत....

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे सर्व अभिनेत्र्यांबरोबर माधुर्याचे संबंध आहे. त्यामुळे निर्मात्यांना त्याच्यासोबत हीरोईनला कास्ट करताना कोणत्याच अडचणी येत नाहीत.पण आता गोष्ट वेगळी आहे. मागच्या चार वर्षांपासून ‘डॉन ३’ची चर्चा सुरू आहे. शाहरुखदेखील यामध्ये इंटरेस्टेड आहे. मात्र जेव्हा निर्माते त्याच्याकडे ‘डॉन ३’चा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा तो त्यांना टाळाटाळ करतोय.या प्रोजेक्टच्या जवळील सुत्रांनुसार शाहरुख प्रियंका चोपडासोबत काम करण्याचे टाळतोय. प्रियंका डॉन सिरीजची महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे ती ‘डॉन ३’मध्येसुद्धा असणार यात काही शंका नाही. आणि हेच शाहरुखला नकोय!मध्यंतरी त्या दोघांचे अफेयर आहे अशा बातम्या पसरल्या होत्या. एवढेच काय त्याची पत्नी गौरीदेखील यामुळे नाराज झाली होती. पुन्हा असे होऊ नये यासाठी काळजी म्हणून शाहरुख प्रियंकापासून शक्य तितके लांब राहण्याचा प्रयत्न करतोय.आता शाहरुखच्याबाबतीते हे नवीनच ऐकायला मिळतेय. निदान अजुन तरी ‘डॉन ३’वर काम सुरू झालेले नाहीए. म्हणून यामध्ये काही तथ्य आहे का ते पुढे कळेलच.