Join us

‘डॉन ३’ ची श्रद्धाला मिळाली नव्हती आॅफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 10:36 IST

 श्रद्धा कपूरचा नुकताच रिलीज झालेल्या ‘बाघी’ चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ ...

 श्रद्धा कपूरचा नुकताच रिलीज झालेल्या ‘बाघी’ चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ साठी शूटिंग करत आहे. तमीळ चित्रपट ‘ओके कन्मनी’ चा हा हिंदीतील रिमेक आहे. ‘आशिकी २’ कपलचा हा श्रद्धा आणि आदित्य रॉय कपूर यांचा दुसरा चित्रपट आहे.तिला विचारण्यात आले की, ती कोणत्याही को-स्टार सोबत पुन्हा काम करत नाही. मग, ती आदित्यसोबत तर दुसºयांदा चित्रपट साकारतेय ते का? तेव्हा ती म्हणाली,‘ असा काही माझा फंडा नाही. ते असेच होऊन जाते. मला वाटतं की, आम्ही योग्यवेळी योग्य ठिकाणी आहोत. आदित्य आणि मला दोघांनाही स्क्रिप्ट प्रचंड आवडली त्यामुळे आम्ही एकत्र दिसतोय. ’सेटवरील अनुभव शेअर करताना ती म्हणते,‘खरंच खुप छान वाटतेय. आम्ही चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केले आहे. दिग्दर्शक शाद अली खुपच छान आहेत. ’श्रद्धा ‘रॉक आॅन २’ को स्टार आणि निर्माता फरहान अख्तर सोबत दिसल्याने तिला ‘डॉन ३’ ची आॅफर मिळाल्याची चर्चा आहे. पण ती म्हणते की, मला डॉन ३ आॅफर करण्यात आला नव्हता. आणि मला हे देखील माहित नाही कदाचित ते केव्हाही सांगू शकतील.