‘ट्यूबलाईट’च्या सेटवर सर्वप्रथम कबीर व सलमान यांच्यात काहीतरी बिनसल्याची बातमी आली होती. पुढे हे संबंध आणखीच बिनसलेत. सूत्रांचे मानाल तर ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपटचं हे संबंध बिघडण्यामागचे कारण ठरला. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटल्याचे आपल्याला ठाऊक आहेच. या चित्रपटाचे शूटींग सुरू असतानाच सलमानला म्हणे अनेक गोष्टी खटकल्या होत्या. सलमानने त्या गोष्टी कबीरच्या लक्षातही आणून दिल्यात. पण कबीर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत. पुढे ‘ट्यूबलाईट’चे लडाखमधील शूटींग संपवून कबीर व सलमान मुंबईत परतले, तोपर्यंत त्यांच्या मतभेदाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. अर्थात त्यावेळी कबीरने हसत हसत या बातम्यांचा इन्कार केला होता. पण ‘एक था टायगर’च्या सीक्वलसाठी कबीरला सोडून अली अब्बास जफर याला साईन करण्यात आले आणि या मतभेदांच्या बातमीला एकप्रकारे दुजोराच मिळाला. ताजी बातमी खरी मानाल तर कबीरने म्हणे, अलीकडे आपल्या एका चित्रपटासाठी सलमानशी संपर्क साधला. पण सलमानने त्यात जराही इंटरेस्ट दाखवला नाही. सलमानने कबीरला सोडून अली अब्बासला जवळ केले. तिकडे कबीरनेही रणवीर सिंगला साईन केले. कबीर खान लवकरच कपिल देव याच्या आयुष्यावरील बायोपिक घेऊन येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूूमिकेत आहे.
ALSO READ : ‘ट्युबलाईट’च्या क्लायमॅक्सवरून सलमान का पेटला हट्टाला?