सिद्धार्थसोबतचे नाते का मान्य करत नाही आलिया ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 10:52 IST
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, हे काही कुणाला माहिती नाही का? ते दोघे व्हॅकेशन्स, हॉलीडेवर ...
सिद्धार्थसोबतचे नाते का मान्य करत नाही आलिया ?
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, हे काही कुणाला माहिती नाही का? ते दोघे व्हॅकेशन्स, हॉलीडेवर फिरायला जातात. पण, तरीही ती त्याच्यासोबतचे नाते का मान्य करत नाही हे काही कळत नाही. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणते,‘मी कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे ? याविषयी कुणाला काय कर्तव्य आहे.आणि कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये राहायलाच हवे असे कुणी सांगितलेय. माझे कुणासोबत ब्रेकअप झाले तर मी काय जगू शकणार नाही का? मला कुणी असेही विचारेल का ? की, आपका ब्रेकअप होगया, अब अगला कौन? हू इज नेक्स्ट?हा समाज महिलांना आणि मुलींना कधीही त्यांना हवे तसे राहू देत नाही.’ हेच खरे आहे. वेल, आलिया तर फारच भडकलेली दिसतेय. डोन्ट वरी, पण तू लवकरच त्याच्यासोबतचे हे नाते मान्य करशील, असेही आम्हाला वाटते.