अक्षय वर्षाला दोन-तीन चित्रपटात तरी काम करतो. त्यामुळे तो त्याच्या कामात प्रचंड व्यग्र असतो. पण तो कितीही कामात बिझी असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना पहिले प्राधान्य देतो. तो जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. अक्षय जुहूत त्याच्या कुटुंबियांसोबत राहातो. या घरात अक्षय, नितारा, आरव यांच्यासोबतच त्यांचा जर्नम शेफर्ड जातीचा कुत्रा देखील राहातो. त्याचे घर हे अलिशान आहे. या घराचे इंटेरियर स्वतः ट्विंकल खन्नाने बनवलेले आहे. तिने जगभरातील विविध भागांमधून हे इंटेरियर स्वतः आणलेले आहे. त्याचा फ्लॅट हा ड्युप्लेक्स असून पहिल्या फ्लोअरवर किचन, होम थिएटर, ट्विंकलचे ऑफिस, लिव्हिंग रूम, डायनिंग रूम आहे तर दुसऱ्या फ्लोअरवर बेडरूम, पॅन्ट्री, अक्षय आणि ट्विंकलचे ऑफिस आणि बाल्कनी आहे. या बाल्कनीमध्ये अनेकवेळा अक्षय त्याच्या मुलांसोबत खेळताना दिसतो. त्याच्या बिल्डिंगच्या समोरच अथांग समुद्र आहे.
अक्षय हा एकमेव अभिनेता आहे जो रविवारच्या दिवशी काम करत नाही. रविवारचा त्याचा वेळ हा केवळ त्याच्या कुटुंबियांसाठी असतो. रविवारी तो त्यांच्यासोबत घरातच वेळ घालवतो अथवा त्यांना घेऊन फिरायला जातो.
Also Read : अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाचा टीजर आऊट