Join us

‘स्लमडॉग मिलिनेयर’मधील लहानगी लतिका तुम्हाला आठवते काय?, आता पहा कशी दिसते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST

‘स्लमडॉग मिलिनेयर’ या चित्रपटात लतिका नावाचे पात्र साकारणारी रुबिना अली आता १७ वर्षांची झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी तिने या चित्रपटात काम केले होते. लहानगी लतिका आता मोठी झाली असून, जॉबसाठी प्रयत्न करीत आहे. यानिमित्तच तिचे काही फोटोज् आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.

‘स्लमडॉग मिलिनेयर’ या चित्रपटात लतिका नावाचे पात्र साकारणारी रुबिना अली आता १७ वर्षांची झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी तिने या चित्रपटात काम केले होते. लहानगी लतिका आता मोठी झाली असून, जॉबसाठी प्रयत्न करीत आहे. यानिमित्तच तिचे काही फोटोज् आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. लतिका ऊर्फ रुबिना अली कधीकाळी बांद्रा येथील एका झोपडपट्टी राहात होती. परंतु २०११ मध्ये तिच्या घराला आग लागली अन् त्यामुळे ती बेघर झाली.सध्या रुबिना मुंबई येथून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील नालासोपारा भागात एकटीच राहाते. रुबिनाचे स्वप्नही इतर मुलींप्रमाणे अभिनेत्री बनण्याचे आहे.सध्या रुबिना नोकरीच्या शोधात असून, तिच्यासाठी कोणतेच काम छोटे नसल्याचे ती सांगते.रुबिना बीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. रुबिनाच्या घराला जेव्हा आग लागली होती, तेव्हा तिला आॅस्करमध्ये मिळालेले अवॉर्ड आणि फोटोज् जळून खाक झाले. आज रुबिनाकडे कुठलीच आठवण नाही.