जाणुन घ्या का दाखविला जातो सुर्यवंशम हा चित्रपट सारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 17:02 IST
सुर्यवंशम हा चित्रपट टिव्ही वर सारखा दाखविला जातो. त्यामुळे या चित्रपटावर सोशल साईट्सवर अनेक जोक्स देखील व्हायरल झाले आहेत. ...
जाणुन घ्या का दाखविला जातो सुर्यवंशम हा चित्रपट सारखा
सुर्यवंशम हा चित्रपट टिव्ही वर सारखा दाखविला जातो. त्यामुळे या चित्रपटावर सोशल साईट्सवर अनेक जोक्स देखील व्हायरल झाले आहेत. या सिनेमाने टीव्हीवर अनेकदा टेलिकास्ट होण्याचा अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स आॅफीसवर खूप कमाई केली नसली तरीही 'सेट मॅक्स' (आताचे सोनी मॅक्स) या टीव्ही चॅनेलवर सिनेमाचा अक्षरश: रतीब घालण्यात येतो. १९९९ साली रिलीज झालेला हा सिनेमा सोनी मॅक्सवर आठवड्यातून कमीत कमी मान एकदा तरी दाखवलाच जातो. इतर अनेक सिनेमे असतानाही केवळ हाच चित्रपट पुन्हा पुन्हा का दाखवला जातो? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी हा सस्पेन्स उघड केला आहे. चॅनलने १०० वर्षांसाठी विकत घेतले सिनेमाचे हक्क... सोनी मॅक्स (पूवीर्चे सेट मॅक्स) च्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांच्या सांगण्यानुसार, सोनी मॅक्सने या सिनेमाचे हक्क १००वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळेच हा सिनेमा परत परत दाखवला जातो. एकाच वर्षी आले सिनेमा आणि चॅनल...दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, हा सिनेमा ज्यावर्षी प्रदर्शित झाला, त्याच वर्षी म्हणजेच, १९९९ साली सेट मॅक्स चॅनेलही सुरू झाले होते, त्यामुळे चॅनेलचे या सिनेमाशी एक अनोखे नातेच आहे. सोशल मीडियावर या सिनेमासंदर्भात अनेकदा मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत असला तरीही त्या सिनेमाचे चाहतेही अनेक आहेत. त्यामुळेच अजून अनेक दशकं या सिनेमाला (चॅनेलवर तरी) मरण नाही आणि चाहत्यांना त्यांच्या लाडक्या बिग बींना हिरा ठाकूर आणि भानुप्रताप यांच्या दुहेरी भूमिकेत बघता येणार आहे.