Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेण्यांमध्ये असलेल्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत का ?, बॉलिवूडवर करतेय आज राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 18:47 IST

बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांचं बालपणीचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो(Bollywood Celebs Childhood Photos)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच क्रमात पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो (Bollywood Actress Childhood Photo)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतायेत.  या फोटोत ती  शाळेच्या गणवेशात दिसत आहे आणि दोन वेण्यांमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. पण ती कोण आहे हे ओळखणे अनेकांना कठीण जात आहे.

फोटोमध्ये आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून साऊथ  (South) आणि बॉलिवूड अभिनेत्री  (Bollywood Actress) तापसी पन्नू (Taapsee Pannu)आहे. या फोटोत दिसत आहे की तापसी पन्नू शाळेत झालेल्या स्पोर्ट्समध्ये पहिली आली आहे. फोटोमध्ये थोडेसे स्मितहास्य करून, ती तिच्या बक्षीससह उभी आहे. 

तापसीचा आगामी चित्रपट डंकी आहे. ज्यामध्ये ती शाहरुख स्टारर चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील काळात ते रिलीज होऊ शकते. याशिवाय तिच्याकडे 'वो लड़की है कहाँ', 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'जन गण मन' सारखे चित्रपट आहेत. 

टॅग्स :तापसी पन्नू