Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाहुबली’ला मारणा-या कटप्पाची कथा जाणून घ्यायचीय? मग हे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 15:42 IST

‘बाहुबली’मध्ये बाहुबलीशिवाय सगळ्यात प्रभावी व्यक्तिरेखा कुठली तर एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे कटप्पाचे. होय, बाहुबलीप्रमाणेच कटप्पाच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर ...

‘बाहुबली’मध्ये बाहुबलीशिवाय सगळ्यात प्रभावी व्यक्तिरेखा कुठली तर एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे कटप्पाचे. होय, बाहुबलीप्रमाणेच कटप्पाच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलयं. प्रगल्भ अभिनयासाठी ओळखला जाणारा दाक्षिणात्य अभिनेता सत्यराज याने कटप्पाची भूमिका साकारली आहे. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये कटप्पाने बाहुबलीची हत्या केली आणि त्यानंतर ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या एकाच प्रश्नाने प्रेक्षकांना ग्रासले.  २८ एप्रिलला या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. कारण या दिवशी ‘बाहुबली2’ रिलीज होतो आहे. या चित्रपटात ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकते. पण त्याआधी या प्रश्नाचे काही पत्ते नक्कीच खुलू शकतात. खुद्द ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आनंद नीलकांतन यांच्या ‘बाहुबली बिफोर दी बिगीनिंग : द राइज आॅफ शिवगामी’ या पुस्तकातील काही उतारे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.यात कटप्पाची कथा आहे. हे उतारे वाचल्यावर तुम्ही कटप्पाबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. कटप्पाचे कुटुंब हे महिष्मतीच्या राजघराण्याचे गुलाम होते आणि सिंहासनाप्रती कटिबद्ध होता. ‘बाहुबली’मध्येही असेच दाखवण्यात आले आहे. कटप्पाच्या बालपणाशी निगडीत काही गोष्टी  ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या रहस्याकडे आपल्याला घेऊन जातात.‘राइज आॅफ शिवगामी: बाहुबली बिफोर दी बिगीनिंग’ हे पुस्तक राजामौली यांनी एका साहित्य महोत्सवात एक पुस्तक प्रकाशित केले होते. यात ‘बाहुबली: दी बिगीनिंग’च्या आधीची संपूर्ण कथा कथन करण्यात आली आहे.  आनंद नीलकांतन यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात शिवगामी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड कसा घेतो, हे यात लिहिले गेले आहे. चित्रपटात ही भूमिका राम्या कृष्णन हिने साकारली आहे.