Join us  

सावलीसारखा असतो दीपिका पादुकोणसोबत तिचा बॉडीगार्ड, त्याची सॅलरी वाचून तुमचे डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:06 PM

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पर्सनल बॉडीगार्ड आहे जो कित्येक वर्षे तिच्यासोबत सावलीसारखा उभा आहे. या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे.

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत सावलीसारखा एक माणूस कायम असतो. दीपिका त्याला राखीही बांधते आणि तोही दीपिकाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असतो. या माणसाचे नाव आहे जलाल. जेव्हा दीपिका घरातून बाहेर पडली की जलाल कायम तिच्या सोबत असतो.दीपिका पादुकोणचा बॉडीगार्ड  जलाल मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी  आहे. अनेक वर्षांपासून तो दीपिकाच्यासोबत आहे. जेव्हा इटलीत रणवीर आणि दीपिका यांचे लग्न झाले तेव्हाही जलाल सोबत होता. फार क्वचित दीपिकासोबत जलाल नसतो.  मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाचा बॉडीगार्ड जलाल वर्षाला 80 लाख सॅलरी घेतो. महिन्याच्या सॅलरीबद्दल सांगायचे तर तर त्याला महिन्याला 6 लाखांहून अधिक सॅलरी मिळते. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका ती साकारताना दिसणार आहे.

रणवीर सिंगने कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील आहेत.

टॅग्स :दीपिका पादुकोण