याचा खुलासा साक्षी आणि अनुष्काच्या काही जुन्या फोटोंवरून होतो. साक्षी आणि अनुष्काचे हे फोटो अनुष्काच्या फॅन क्लब ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. या दोघींचे चाहत्यांनी असे काही फोटो शेअर केले, जे बघून सगळेच चकीत झाले आहेत. दोघींचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अनुष्काने स्वत:च याबाबतचा खुलासा करताना साक्षी आणि मी एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले.
२०१० मध्ये धोनीसोबत लग्न झाल्यानंतर साक्षी आणि अनुष्काची पुन्हा भेट झाली नव्हती. मात्र या रिसेप्शन सोहळ्यात पुन्हा एकदा या जुन्या मैत्रिणी एकमेकींना भेटल्या. दरम्यान साक्षीने सांगितले की, आम्हा दोघींचे मार्घेरिटाच्या सॅण्टमॅरी स्कुलमध्ये शिक्षण झाले. जेव्हा या दोघींनी त्यांचे हे जुणे फोटो बघितले तेव्हा त्यांना एकमेकींना ओळखणे अवघड झाले.