तुम्हाला माहीत आहे का? या बॉलिवूडच्या अभिनेत्री होत्या लग्नाच्याआधी गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:14 IST
मूल हे लग्नानंतरच असायला पाहिजे असे म्हटले जाते. पण हा टाबू ओलांडून लग्नाच्याआधी मुलाला जन्म देणाऱ्या अथवा गरोदर असलेल्या ...
तुम्हाला माहीत आहे का? या बॉलिवूडच्या अभिनेत्री होत्या लग्नाच्याआधी गरोदर
मूल हे लग्नानंतरच असायला पाहिजे असे म्हटले जाते. पण हा टाबू ओलांडून लग्नाच्याआधी मुलाला जन्म देणाऱ्या अथवा गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. एक नजर टाकूया या अभिनेत्रींवर...श्रीदेवी श्रीदेवीने 1996मध्ये बोनी कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर काहीच महिन्यात जान्हवी या त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला. श्रीदेवीने लग्न केले, त्याचवेळी तिला सातवा महिना सुरू होता. लग्नाअगोदर गरोदर असल्याचे श्रीदेवीने मुलाखतींमध्ये मान्यदेखील केले आहे. कोंकणा सेन शर्माकोंकणा आणि रणवीर शौरी यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर सप्टेंबर 2010मध्ये घरातच अतिशय साधेपणाने लग्न केले. लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांनी कोंकणा गरोदर असल्याची बातमी मीडियाला दिली आणि 2011च्या सुरुवातीलाच कोंकणाने मुलाला जन्म दिला. सारिकाकमल हासनचे पहिले लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री वाणी गणपतीसोबत झाले होते. लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांच्यात भांडणे होऊ लागली. कारण कमल हासनच्या आयुष्यात वाणीची जागा सारिकाने घेतली होती. वाणीशी घटस्फोट न घेता कमल सारिकासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी सारिका आणि कमलचे लग्न झालेले नव्हते. श्रुतीच्या जन्मानंतर कमलने वाणीला घटस्फोट दिला आणि सारिकासोबत लग्न केले. अमृता अरोराअमृता अरोरा आणि व्यवसायिक शकील लडाक यांनी अचानकच लग्नाचा विचार केल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अमृता गरोदर असल्याने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. सेलिना जेटलीसेलिनाने जुलै 2011मध्ये दुबईस्थित व्यवसायिक पीटर हॅगसोबत लग्न केले. पीटर आणि सेलिना लग्नाच्या कित्येक महिने आधीपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर आठच महिन्यात सेलिनाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. महिमा चौधरीमहिमा चौधरीने बॉबी मुखर्जीसोबत 2006मध्ये लग्न केले. लग्नानंतर काहीच महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. तिने अचानक लग्नाचा निर्णय घेतला होता. नीना गुप्तानीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्डस यांना मसाबा ही मुलगी आहे. विवियनच्या आयुष्यात नीना आली, त्यावेळी त्याचे लग्न झालेले होते. त्याने आयुष्यभर त्याच्या पत्नीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. विवियनने नीनाशी लग्न न केल्याने तिने एकटीनेच मसाबाला सांभाळले.