Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्थ डे गर्ल’ मल्लिकाबद्दल तुम्हाला ‘हे’ ठाऊक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 17:21 IST

बॉलिवूडची ‘बोल्ड अ‍ॅण्ड हॉट गर्ल’ अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा आज वाढदिवस आहे. मल्लिकाने आज (24 आॅक्टोबर)वयाच्या ४० व्या वर्षात ...

बॉलिवूडची ‘बोल्ड अ‍ॅण्ड हॉट गर्ल’ अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा आज वाढदिवस आहे. मल्लिकाने आज (24 आॅक्टोबर)वयाच्या ४० व्या वर्षात पदार्पण केले.  तिच्या वाढदिवसा निमित्ताने जाणून घ्या तिच्याबद्दलच्या 'या' १० गोष्टी.
 
 मल्लिका शेरावतचे मूळ नाव रीमा लांबा. ती मूळची हरयाणातील रोहतक जिल्ह्याची आहे. बॉलिवूडमधला आणखी एक यशस्वी कलाकार रणदीप हूड्डा सुद्धा याच जिल्ह्यातील आहे. एकाच जिल्ह्यातील असले तरी कधीही या दोघांची भेट झालेली नाही. 
 
वासू भगनानीच्या ‘जीना सिर्फ तेरे लिए’ या सिनेमात मल्लिकाने सहाय्यक भूमिका केली आणि इथून मल्लिकाच्या करीयरला सुरुवात झाली. तिने या चित्रपटात करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती.  
 
 पहिल्या चित्रपटात मल्लिकाने तिचे मूळ नाव रीमा लांबाच लावले होते. पण ‘मर्डर’ सिनेमापासून तिने रीमा लांबा नाव लावणे बंद केले. तिने आपल्या आईचे आडनाव शेरावत नाव वापरण्यास सुरुवात केली. आईने चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी जो पाठिंबा दिला त्यासाठी मल्लिकाने शेरावत नाव धारण केले. 
 
ख्वाइश’ हा मल्लिका शेरावतचा नायिका म्हणून पहिला चित्रपट, गोविंग मेनन दिग्दर्शित या चित्रपटात मल्लिकाने चुंबन दुश्याने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या चित्रपटात मल्लिकाचे भरपूर किसींग सीन होते. 
 
 
 ‘ख्वाईश’नंतर आलेल्या मर्डरमधील इमरान हाश्मीसोबतच्या सेक्स सीन्समुळे मल्लिकाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण मल्लिकाने  ‘ख्वाईश’मधील नायक आणि इमरान हाश्मीसोबत पुन्हा चित्रपट केला नाही. तिने राहुल बोससोबत ‘प्यार के साईड इफेक्टस’ आणि ‘मान गए मुगल-ए-आझम’ हे दोन चित्रपट केले.  
 
  चित्रपटात काम करण्याच्या मल्लिकाच्या इच्छेला तिच्या वडिलांचा कधीच पाठिंबा नव्हता. तिचे वडिल पारंपारिक विचारसरणीचे होते. मल्लिकाचा भाऊ आणि आईने मात्र चित्रपटात काम करण्याच्या तिच्या इच्छेला कधी विरोध केला नाही. 
 
  मल्लिका अभिनेते धर्मेंद्र यांची मोठी चाहती आहे, ‘किस किस किस्मत’ या चित्रपटामध्ये तिला धर्मेंद्रसोबत काम करण्याची संधी मिळाली; तेव्हा धर्मेंद्रबद्दल मल्लिकाची आपुलकीची भावनापाहून पत्नी हेमा मालिनीही धक्का बसला होता. 
 
 ‘मर्डर’च्या चित्रीकरणाच्यावेळी मल्लिकाने ती कुमारीका असल्याचा दावा केला होता.  चित्रपटसृष्टीत येण्याआधी मल्लिकाचा विवाह झाला होता. तिचा पती वैमानिक होता. 
 
  'पॉलिटीक्स आॅफ लव्ह' या हॉलिवूडच्या चित्रपटात मल्लिकाने काम केले आहे. 
 
 चारवषार्नंतर ‘डर्टी पॉलिटिक्स’मधून मल्लिका शेरावत प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेते ओम पूरी या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होते. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटात मल्लिकाने हॉट सीन दिले आहेत. १२ वषार्तील बॉलिवूड करीयरमध्ये मल्लिकाने १५ चित्रपटात काम केले. त्यात १३ फ्लॉप आणि दोन हिट चित्रपट होते.