दिशा पटानीला नकोय टायगर श्रॉफची मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 14:52 IST
टायगर श्रॉफ व दिशा पटनी यांच्या रिलेशनशिपबद्दल आता लपून राहिलेली नाही. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सतत येत असतात. ...
दिशा पटानीला नकोय टायगर श्रॉफची मदत!
टायगर श्रॉफ व दिशा पटनी यांच्या रिलेशनशिपबद्दल आता लपून राहिलेली नाही. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सतत येत असतात. याशिवाय दिशाच्या करिअरसाठी टायगर काय काय धडपड करतो, हेही कानावर येत असते. पण खरे सांगायचे तर दिशा या बातम्यांना आता वैतागली आहे. विशेषत: टायगरमुळेच दिशाला चित्रपट मिळतात, तोच तिला सल्ला देतो, तोच चित्रपट निवडण्यात तिची मदत करतो, या बातम्यांचा दिशाला संताप यायला लागला आहे. सूत्रांचे मानाल तर, टायगरमुळेच ती अधिक चर्चेत असते, हे दिशाला खटकू लागले आहे. त्यामुळे तिने एक मोठ्ठा निर्णय घेतला आहे. होय, हा निर्णय म्हणजे, टायगरची मदत न घेण्याचा. ऐकता ते खरे आहे. यापुढे आपले काम आपल्या पद्धतीने करायचे, हे दिशाने ठरवून टाकले आहे. टायगरलाही तिने हे स्पष्ट शब्दांत सांगितलेय. माझ्यासाठी कुठल्याही निर्मात्या-दिग्दर्शकाशी बोलायची गरज नाही, असे तिने टायगरला बजावले आहे. आता दिशाच्या या निर्णयाचा तिला किती फायदा होईल, हे माहित नाही. किमान टायगरच्या मदतीशिवाय दिशा काहीच नाही, ही चर्चा तरी थांबावी, एवढीच एक अपेक्षा आहे.ALSO READ : HOTNESS ALERT : हॉट दिशा पटानीचा आणखी एक बोल्ड लूक! सूत्रांच्या मते, यापुढे माझे मी बघून घेईल, असे दिशाने टायगरला बजावले असले तरी टायगर तिच्या मदतीसाठी आतूर आहे. दिशाने फक्त तोंडातून शब्द बाहेर काढण्याची देर की टायगर तिच्या मदतीसाठी एकदम सज्ज, अशी स्थिती आहे. शेवटी रिलेशनशिपमध्ये असणे, यापेक्षा काय वेगळे आहे. पण दिशा हे समजून घेईल, तेव्हाच ना. असो,आगे आगे क्या होता है, हे बघूच. तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच...