Join us

​‘दंगल’साठी तिकिटांचे दर वाढवू नका!; आमिरची थेटअर मालकांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 18:02 IST

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आमिरच्या चाहत्यांसाठी ‘दंगल’ हा एखाद्या उत्सवाप्रमाणे ठरला आहे. सुरुवातीपासूनच ...

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आमिरच्या चाहत्यांसाठी ‘दंगल’ हा एखाद्या उत्सवाप्रमाणे ठरला आहे. सुरुवातीपासूनच ‘दंगल’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाल क रेल असे अंदाज व्यक्त करण्यात आला होता. देशभरातील सर्व थेअटर हाऊसफुल्ल झाले असून याच पाश्वभूमीवर आमिरने चित्रपटगृह मालकांना व संचालकांना एक विनंती केली आहे. आमिर खान अभिनित स्पोटर्स ड्रामा ‘दंगल’ने चांगली ओपनिंग मिळविली आहे. या चित्रपटाचे पहिले दिवसाचे शो हाऊसफुल्ल झाले असून अ‍ॅडव्हाँस बुकिंग सुरू आहे. चित्रपट हाऊसफुल्ल झाल्यास तिकिटांचे दर वाढविले जातात असा एक ट्रेन्ड मनोरंजन जगतात आहे. यामुळे ‘दंगल’च्या येणाºया शोचे तिकीट दर वाढविले जाऊ नयेत असे आमिरला वाटू लागले आहे. यासाठी आमिरने चित्रगृहमालकांना आवाहन केले आहे.आमिर खान म्हणाला, मला वाटते ‘दंगल’ हा चित्रपट प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावा. यासाठी चित्रपटगृह मालकांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यांनी शो हाऊसफुल होत असले तरी देखील तिकिटांचे दर वाढवू नये. आम्ही या चित्रपटाला सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ‘दंगल’ हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केला असून सुमारे ११ राज्यात टॅक्स फ्री करण्यात यावा यासाठी आमिर खान प्रयत्न करीत आहे. टॅक्स फ्री झाल्याने या चित्रपटांचे दर कमी होतील व सर्वांना हा चित्रपट पाहता येईल असा या मागील हेतू आहे. ‘दंगल’ हा २०१६ या वर्षातील बॉलिवूडमधील ‘मैलाचा दगड’ मानला जात असून या चित्रपटाची समीक्षकांनी दाद दिली. मुलीना समाजात अभिशाप मानला जातो यावर या चित्रपटातून परखड टिका करण्यात आली आहे.