Join us
Daily Top 2Weekly Top 5

Don't Miss : पहा जॅकलीन फर्नांडिसचा हॉट सिजलिंग डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 17:57 IST

​अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय आहे. जॅकलीन तिच्या आगामी चित्रपटातील पोल डान्समुळे चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय आहे. जॅकलीन तिच्या आगामी चित्रपटातील पोल डान्समुळे चांगलीच चर्चेत आहे. आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात ती पोल डान्स करताना बघावयास मिळणार असून, तिच्या डान्स मूव्ज बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच्याशी संबंधित जॅकलीनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये जॅकलीनचा हॉट सिजलिंग अंदाज बघण्यासारखा आहे. वास्तविक व्हिडीओमध्ये जॅकलीन डान्स प्रॅक्टीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ जॅकलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, चाहत्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत आहे. जॅकलीनने व्हिडीओ शेअर करताना हेही अनाउंस केले की, हा एक वर्कशॉप आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जॅकलीनने लिहिले की, ‘यांच्यासोबत काम करताना खूप चांगले वाटत आहे.’ जॅकलीन अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे ‘ओ चंद्रलेखा’ हे गाणे गेल्या ३ आॅगस्ट रोजीच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात लीड स्टार्स खूप मस्ती करताना दिसत आहेत. गाणे बघून असे वाटत आहे की, सिद्धार्थ त्याच्या आॅफिसच्या पार्टीमध्ये असावा. जिथे जॅकलीनला बघून तो खूप डान्स करतो.  गाण्यास सिडच्या कूल मुव्जबरोबरच जॅकलीनचा हॉट पोल डान्सही आहे. या पोल डान्स बघून तुम्हालाही डान्स करावेसे वाटेल. हे गाणे एक पेपी नंबर असून, वारंवार ते ऐकावसे वाटते. ‘ओ चंद्रलेखा’ हे गाणे विशाल ददलानी आणि जोनिता गांधी यांच्या आवाजातील आहे. तर सचिन जीगर याने त्यास म्युझिक कंपोझ केले आहे. सध्या हे गाणे यु-ट्यूबवर जबरदस्त हिट ठरत आहे. दरम्यान, जॅकलीनच्या या नव्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत कोरिओग्राफर बेन सोयजा दिसत आहे. दोघांच्याही जबरदस्त अदा बघण्यासारख्या आहेत.