स्वत:ला चौकटीत बांधू नका - अनुष्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:30 IST
काही अँक्टर्स हीट फॉम्युला वापरून तेच तेच चित्रपट करण्यात धन्यता मानतात. मात्र अनुष्का शर्मा याला अपवाद आहे. गायक, पत्रकार, ...
स्वत:ला चौकटीत बांधू नका - अनुष्का
काही अँक्टर्स हीट फॉम्युला वापरून तेच तेच चित्रपट करण्यात धन्यता मानतात. मात्र अनुष्का शर्मा याला अपवाद आहे. गायक, पत्रकार, वेडिंग प्लॅनर, डान्सर आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तिने चंदेरी पडद्यावर साकारलेल्या आहे. 'एनएच-१0'च्या द्वारे निर्मितीच्या क्षेत्रातही तिने पाऊल ठेवले. याबाबत ती म्हणते की, 'एखाद्या साच्यात मला स्वत: अडकवून नाही ठेवायचे. नवनवीन आव्हाने, भूमिका स्वीकारण्याकडे माझा कल असतो.' निर्माती होण्याबाबत ती सांगते की, 'उत्कृ ष्ट कथांना मोठय़ा पडद्यावर आणण्यासाठी मी प्रोड्युसर झाले. एनएच-१0 ची कथा एक सामाजिक संदेश देण्याबरोबर थ्रीलरपण होती. म्हणून मी तो निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. पण अँक्टिंग हे माझे पहिले प्रेम आहे. चौकट मोडून काही तरी मी करू पाहत आहे. यामुळे खूप खूश आहे.'