Join us

​दीया मिर्जा बनविणार ‘वाघ वाचवा’ विषयावर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 14:52 IST

अभिनेत्री दीया मिर्जा जागतिक वाघ दिनानिमित्त वाघ आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी एक चित्रपट बनविणार आहे. हे तिचे पहिले निर्देशन असेल. ...

अभिनेत्री दीया मिर्जा जागतिक वाघ दिनानिमित्त वाघ आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी एक चित्रपट बनविणार आहे. हे तिचे पहिले निर्देशन असेल. चित्रपटाचा उद्देश विविध वयोगटातील मुलांच्या आवाजाच्या माध्यमातून वाघ आणि निसर्गाचे संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश देणे होय. दीयाने एका मुलाखतीत सांगितले की, हा तिच्या जीवनातील सर्वात सुंदर अनुभवातील एक  असेल. आणि भावी पिढीलाही यात समावेश करणे खूप आनंद देणारी बाब असेल. चित्रपटाची पटकथा कारा तेजपाल आणि साहिल संघाने लिहीली आहे आणि बॉर्न फ्री एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे.