दिवाळी पार्टीत एक्स-बॉयफ्रेन्डला समोर पाहून अशी झाली बिपाशा बासूची अवस्था!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 12:36 IST
बिपाशा बासू आणि तिचा लाडका हबी करण सिंग ग्रोव्हर या दोघांनी अलीकडे सोशल मीडियावर दिवाळी पार्टीचे फोटो शेअर केलेत. ...
दिवाळी पार्टीत एक्स-बॉयफ्रेन्डला समोर पाहून अशी झाली बिपाशा बासूची अवस्था!!
बिपाशा बासू आणि तिचा लाडका हबी करण सिंग ग्रोव्हर या दोघांनी अलीकडे सोशल मीडियावर दिवाळी पार्टीचे फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये ‘मंकी कपल’ नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल पण या दिवाळी पार्टीत बिपाशाला काहीशा विचित्र स्थितीला सामोरे जावे लागले. आता तुम्ही म्हणाल दिवाळी पार्टीत असे काय झाले? तर या पार्टीत बिपाशा व तिचा एक्स बॉयफ्रेन्ड आमोरा-सामोर आलेत. मग काय, बिपाशाची स्थिती बरीच अवघडल्यासारखी झाली. विशेष म्हणजे, एकदा नाही तर गत तीन दिवसांत दोनदा बिपाशासोबत हेच घडले. आता बिपाशाचा हा एक्स-बॉयफ्रेन्ड म्हणजे, जॉन अब्राहम असे समजू नका. कारण तो जॉन नाहीच. त्याचे नाव हर्मन बावेजा. होय, हर्मन बावेजा एकदा नाही तर दोनदा बिपाशाला धडकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत बिपाशा व हर्मन आमने-सामने आलेत. हर्मनला अचानक समोर पाहून बिपाशा जाम संकोचली. तिला काय बोलावे तेच कळेना. या आॅक्वर्ड सिच्युएशनमध्ये अर्थातच बिपाशाचा हबी तिच्या मदतीला धावून आला.तुषार कपूरशी भेटायच्या बहाण्याने त्याने बिपाशाला क्षणात तिथून दूर नेले आणि बिपाशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दुसºयाच दिवशी पुन्हा हेच घडले. दुसºया दिवशी शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत बिपाशाला नेमक्या अशाच आॅक्वर्ड सिच्युएशनला सामोरे जावे लागले. ALSO READ: OMG!! एक्स-वाईफचे चाहते झाले अॅक्टिव्ह! करण सिंह ग्रोव्हर अन् बिपाशा बासूला म्हटले ‘बंदर अन् लंगूर की जोडी’!शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत पुन्हा एकदा हर्मन आणि बिपाशा एका छताखाली आलेत. शिल्पा शेट्टीने अर्थात बिपाशा व हर्मनचे अवघडलेपण काहीसे दूर केले. पाहुण्यांनी भेट करून घेण्याच्या निमित्ताने हर्मन व बिपाशाची नजरा-नजर झाली. शिल्पा सोबत असल्याने दोघांमधील अवघडेपण काहीसं कमी झालं आणि तेव्हा कुठे बिपाशा व हर्मनने एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. या पार्टीत हर्मनने बिपाशा व करण या दोघांचे अभिनंदन केल्याचेही कळते. अभिनंदन कशासाठी तर त्यांच्या लग्नासाठी. खरे तर करणसिंह ग्रोव्हर याच्यामुळेच बिपाशा व हर्मनचे ब्रेकअप झाल्याचे मानले जाते. आता खरे काय, त्यांनाच ठाऊक़