Join us  

खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 9:54 AM

दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुशांतसोबतच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू देखील वादाचा विषय ठरला आहे. दोन्ही केसला लोक जोडून बघत आहेत. अनेकजण दोन्ही केसचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली त्याच्या काही दिवसांआधीच दिशाने आत्महत्या केली होती. असा रिपोर्ट आहे की, दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे.

aajtak.intoday.in ने दिलेल्या एका वृत्तानुसार, दिशा सालियनच्या एका मैत्रिणीने घटनेच्या दिवसाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी दिशाच्या घरी तिचा होणारा पती रोहन, हिमांशु आणि कॉलेजमधील मित्र नील व दीप हे होते. सगळेच पार्टी करत होते आणि ड्रिंकही करत होते. पण ड्रिंक केल्यानंतर दिशा फार इमोशनल झाली होती. ती पुन्हा पुन्हा बोलत होती की, कुणालाही तिची काळजी नाही. यावरून शंका निर्माण होऊ शकते. पण दिशाच्या मैत्रिणीने सांगितले की, ड्रिंक घेतल्यावर ती नेहमीच अशा प्रकारे बोलत होती. 

दिशाच्या मैत्रिणीनुसार, घरात पार्टी सुरू होती. पण दिशा रात्री ८ वाजता एका दुसऱ्या मित्रासोबत लॉकडाऊननंतर काय करायचं यावर चर्चा करत होती. त्यानंतर दिशाने यूकेतील मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्यामुळे हिमांशु थोडा नाराज झाला. त्याने तिला रडण्यास मनाई केली कारण पार्टीचा मूड खराब होत होता.

त्यानंतर दिशा तिच्या रूममध्ये गेली आणि तिने दरवाजा आतून बंद करून घेतला. बराचवेळ दिशाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला. रूममध्ये दिशा नव्हती. पण जेव्हा हिमांशु आणि दीपने खाली पाहिलं तर ते हैराण झाले. सगळेच खाली धावत गेले. पण तोपर्यत उशीर झाला होता.

हे पण वाचा :

टॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा

रिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य

टॅग्स :बॉलिवूडगुन्हेगारीसुशांत सिंग रजपूत