Join us

OMG - टायगर श्रॉफ नाही तर साऊथचा सुपरस्टार आहे दिशा पटानीच फेव्हरेट डान्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 14:55 IST

दिशाने स्वत: हा खुलासा केला आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. अभिनेत्री दिशा पटानी सध्या घरात कधी टीव्ही बघून तर कधी टिकटॉक व्हिडीओ करुन टाईपास करतेय.

याच दरम्यान दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये दिशाने खुलासा केला आहे की तिचा फेव्हरेट डान्सर टायगर श्रॉफनसून साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आहे. दिशाने अल्लू अर्जुनचा व्हिडीओ शेअर करत तिच्या डान्सचे कौतूक केले आहे. दिशाने हा व्हिडीओ शेअर करताना अल्लू अर्जुनला टॅगदेखील केले आहे. तो इतका चांगला डान्स कसा करतोस असे देखील दिशाने त्याला विचारले आहे. 

यावर उत्तर देताना अल्लू म्हणाला, मला म्युझिक आवडते आणि जेव्हा पण मी गाणं ऐकतो तेव्हा डान्स करायला लागतो. स्तुती करण्यासाठी धन्यवाद. अल्लू हा साऊथमधील स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन फॉलोईंग आहे. त्याचसोबत तो एक जबरदस्त डान्सरसुद्दा आहे. अल्लू तेलंगणा, आंध्र प्रेदश आणि केरळला कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी 1.25 कोटींची मदत केली आहे.   

 

टॅग्स :दिशा पाटनी