Join us

‘ऐ दिल हैं मुश्किल’साठी ‘डिस्को टाईम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 13:25 IST

 करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा दिवाळीला रिलीज होणार असून चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन आता लवकरच संपणार आहे. ...

 करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा दिवाळीला रिलीज होणार असून चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन आता लवकरच संपणार आहे. मात्र, अजून तीन दिवस शूटींगचे बाकी आहेत. ते पुढील महिन्यात पूर्ण होईल, असे कळते आहे.हे शेवटचे शूटींग मुंबईतील एका स्टुडीओत होणार असून तिथे लंडनमधील नाईट क्लबचा सीन तयार करण्यात येणार आहे. सुत्रांनुसार,‘ हे गाणे रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्यावर शूट करण्यात आलेले डिस्को साँग आहे.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस ते दोघे शूटींग करणार आहेत. नाईट क्लबचा हा सीन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे चर्चेत आहे.’ चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार असून मुख्य भूमिकेत अनुष्का शर्मा आणि फवाद खानही असणार आहेत.