Join us  

‘द डर्टी पिक्चर’ फेम आर्या बॅनर्जीची हत्या नाही तर...! पोस्टमार्टम रिपोर्टमधून वेगळाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:40 PM

शरीरात सापडले दोन लीटर अल्कोहोल

ठळक मुद्देभिनेत्री आर्या बॅनर्जी खरे नाव देवदत्ता बॅनर्जी होते. ती प्रसिद्ध सितार वादक पंडित निखील बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती.

‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव सेक्स और धोखा’ सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता.  पोलिस तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील  फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रथमदृष्ट्या आर्याची हत्या झाली, असा कयास व्यक्त करण्यात आला होता. मात्र तिच्या शवविच्छेदन अहवालातून वेगळाच खुलासा झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आढळून आले. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोलकाता पोलिसचे ज्वार्इंट कमिशनर मुरलीधर शर्मा यांनी सांगितले की, आर्या लिव्हर सिरोसीसची रूग्ण होती. हे हत्येचे प्रकरण नाही. तिच्या पोटात जवळपास दोन लीटर अल्कोहोल आढळले. अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, यादरम्यान तिने मदतीसाठी प्रयत्न केले असावे आणि यात ती पडली असावी. तोंडावर पडल्याने इजा झाल्याने ती रक्तबंबाळ झाली असावी.शुक्रवारी 33 वर्षांच्या आर्याचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये आढळून आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तिच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा आर्या बॅनर्जीचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आता गेले. तेव्हा त्यांना बेडवर आर्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तिच्या नाकातून रक्त वाहत होते. आणि तिला उलटीही झालेली होती.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी खरे नाव देवदत्ता बॅनर्जी होते. ती प्रसिद्ध सितार वादक पंडित निखील बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती.  लव सेक्स और धोखा सिनेमातून तिने डेब्यू केला होता. तसेच ती ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमातही ती दिसली होती. 

टॅग्स :बॉलिवूड