Join us

​ कॅटरिना बनणार दिग्दर्शिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 05:45 IST

होय, ऐकता ते खरं आहे. बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ आता अभिनयासोबतच चित्रपटांचे दिग्दर्शनही करू इच्छिते. कॅटरिनाचे फिल्मी करिअर ...

होय, ऐकता ते खरं आहे. बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ आता अभिनयासोबतच चित्रपटांचे दिग्दर्शनही करू इच्छिते. कॅटरिनाचे फिल्मी करिअर सध्या गटांगळ्या खातयं. अलीकडे आलेला तिचा ‘फितूर’ सिनेमाही बॉक्स आॅफिसवर आपटला. त्यातच रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे कॅटरिना सध्या काहीशी निराश आहे. पण याऊपरही तिने हार मानलेली नाही. आता अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावून पाहण्याचा विचार तिने पक्का केला आहे. कॅटरिना एक अ‍ॅड फिल्म दिग्दर्शित करू इच्छिते, अशी चर्चा आहे. मी यात किती यशस्वी ठरेल, मला माहिती नाही. पण मी प्रयत्न नक्की करणार आहे, असे कॅटरिना म्हटले आहे. दिग्दर्शनात हात आजमावण्याचा निर्धार बार्बी गर्लने केलाच आहे तर आपण तिला शुभेच्छा देऊ यात!