Join us

थेट शाहरूख खानशी पंगा!!​ कमाल आर खानने केली ‘जब हॅरी मेट सेजल’कथा लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 16:03 IST

कमाल आर खान उर्फ केआरके म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा क्रिटीक समजणा-या केआरकेने आता थेट शाहरूख खानशी पंगा घेतलाय. होय, केआरकेने शाहरूखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या आगामी चित्रपटाची कथा आॅनलाईन यूट्यूब चॅनलवर लीक केली.

कमाल आर खान उर्फ केआरके म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा क्रिटीक समजणा-या केआरकेने आता थेट शाहरूख खानशी पंगा घेतलाय.  होय, केआरकेने शाहरूखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या आगामी चित्रपटाची कथा आॅनलाईन यूट्यूब चॅनलवर लीक केली. केआरकेने एक व्हिडिओ अपलोड केला. यात त्याने ‘जब हॅरी मेट सेजल’ची अख्खी कथा सांगितली आहे. इतकेच नाही तर  चित्रपटाच्या हॅशटॅगलाही टॅग केले आहे. ‘This is the complete story n my review of film #JabHarryMetSeja’!’ असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. केआरके केवळ इथेच थांबला नाही तर टिष्ट्वटरच्या माध्यमातूनही त्याने ‘जब हॅरी मेट सेजल’ची कथा लीक केली. आता ही कथा किती सत्य आणि किती असत्य ते आम्हाला ठाऊक नाही. पण केआरकेने लीक केलेली कथा सत्य असेल केआरकेने एसआरकेशी मोठा पंगा घेतला , असे म्हणायला हरकत नाही.ALSO READ : OMG!! ​‘शिवाय’ सोशल मीडियावर लीक?यापूर्वीही केआरकेने अनेक चित्रपटांची कथा लीक केली होती. अलीकडे अजय देवगणच्या ‘शिवाय’ची कथा त्याने लीक केली होती. यानंतर स्वत:चे अकाऊंट डिलिटही केले होते. त्यावेळी केआरके सुटला पण आता तर त्याने थेट किंगखान शाहरूख खानलाच डिवचलेय.‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांची जोडी दिसणार आहे. चित्रपटात शाहरूखने हरविंदर सिंह नेहरा नामक पात्र साकारले आहे. सगळे त्याला  हॅरी म्हणून बोलवतात. चित्रपटात टुरिस्ट गाईड बनलेल्या हॅरीची सेजल नामक एका गुजराती मुलीशी ओळख होते आणि ही ओळख प्रेमात बदलते. सेजलची भूमिका अनुष्काने वठवली आहे.