Join us

का मिळत नाहिए दीपिकाला का काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:22 IST

एका वर्षात ‘१०० कोटी’क्लबमध्ये सामावेश असणारे सलग चार चित्रपट देणाऱ्या दीपिकाकडे एकही नवीन फिल्म नाही हे ऐकून कदाचित बऱ्याच ...

एका वर्षात ‘१०० कोटी’क्लबमध्ये सामावेश असणारे सलग चार चित्रपट देणाऱ्या दीपिकाकडे एकही नवीन फिल्म नाही हे ऐकून कदाचित बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही.परंतु हे खरं आहे. गेल्या सहा महिन्यांत तिने एक नवा चित्रपट साईन केलेला नाही. ‘दीपिकाला आता हॉलीवूडचे वेध लागले, म्हणून ती हिंदी चित्रपट करण्याचे टाळत आहे’ अशीदेखील इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू आहे.परंतु स्वत: दीपिकाने यावर खुलासा करत सांगितले की, मला आता एकाच प्रकारचे चित्रपट करण्याचा कंटाळा आला. काही तरी नवीन, धाडसी, प्रवाहाच्या विरुद्ध असा रोल/कथानक असेल तरच मी स्वीकार करणार आहे.यावेळी तिने जेम्स बाँड फिल्मसाठी आॅडिशन दिली नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच लवकर सलमानसोबत तिचा चित्रपट येणार आहे का, असे विचारल्यावर ती हसत म्हणाली की, अरे अशा बातम्या कशा पसरतात? मी जर सलमानसोबत चित्रपट करत असेल तर स्वत:हून सांगेन. त्यात लपवून ठेवण्यासारखे काय आहे?