Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हाफ गर्लफ्रेंड’ टीमची डिनरवेळी धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:55 IST

 अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर हे सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. चेतन भगत याच्या पुस्तकावर आधारित हा ...

 अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर हे सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. चेतन भगत याच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असून केपटाऊन येथे चित्रपटाची शूटींग सुरू आहे. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते टीमसोबत डीनरसाठी गेले होते.तिथे त्यांनी फन सेल्फी काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘डिनर टाईम मॅडनेस हाफ गर्लफ्रेंड केप टाऊन.’ या फोटोत श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे.चित्रपटाचे कथानक हे माधव आणि रिया यांच्याभोवती फिरणारे आहे. ‘बास्केटबॉल’ या दोघांच्याही फेव्हरेट खेळामुळे त्यांची मैत्री होते. मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफेंड’ चित्रपट १९ मे २०१७ ला रिलीज होईल.