Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलजित म्हणतो,‘करिना ऊर्जा अन् प्रेरणेचा स्त्रोत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 23:15 IST

 पंजाबी गायक दिलजित दोसंझने आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याचा पंजाबी चित्रपट ‘अंबरसरिया’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो ...

 पंजाबी गायक दिलजित दोसंझने आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याचा पंजाबी चित्रपट ‘अंबरसरिया’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो आता त्याचा बॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘उडता पंजाब’ साठी खुप उत्सुक आहे.तो म्हणतो,‘ मी उडता पंजाब केव्हा रिलीज होतो याची वाट पाहतोय. माझी उत्सुकता मला शांत बसू देत नाही. चित्रपटात मी करीना कपूर खानसोबत काम करतोय. खरंतर, हे माझ्या आत्तापर्यंतच्या कामाची पावती आहे की मला करिना सोबत काम करायला मिळते आहे.’मुलाखतीदरम्यान, त्याला बेबोसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,‘ माझे करिनासोबतचे फोटोज सर्वत्र केव्हा जातील यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या मोबाईलमध्ये काही फोटोज आहेत. पण, मला आताच ते फोटो कुठेही शेअर न करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी स्वत:ला खुप कंट्रोल करतोय. पण तिच्यासोबत काम करण्याचा खुप ग्रेट अनुभव होता. ’शूटिंगविषयी बोलताना ते म्हणाले,‘ शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला वाटलं की, करिना येते की नाही? पण ती जेव्हा आली तेव्हा जाणवलं की एखाद्या ग्रेट कलाकारासोबत काम करण्याचा आनंद काय असतो! करिना खुप हार्डवर्किंग आहे. दिग्दर्शकांनी ‘पॅकअप’ केल्यानंतर जर पुन्हा एखाद्या सीनचे पुन्हा शूट करायचे ठरले तर ती ५ मिनिटांत कोणत्याही तक्रारीशिवाय परत येते. बेबो म्हणजे ऊर्जेचा, अभिनयाचा, प्रेरणेचा स्त्रोत आहे.’