Join us

दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:40 IST

'चमकिला' सिनेमामुले झालं कौतुक, पण आता 'नो एन्ट्री २'ला दिला नकार कारण...

Diljit Dosanjh rejects No entry 2: 'चमकीला' सिनेमातून सर्वांना भुरळ घालणारा अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखला जातो. नुकतंच त्याने मेट गालामध्येही पदार्पण केलं. त्याच्या स्टाईलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. दिलजीत स्टार गायक आहे. त्याचे कॉन्सर्ट्स हाऊसफुल असतात. देशात परदेशातही सगळीकडे तो सुपरहिट आहे. गायनासोबतच दिलजीत अभिनयातही तरबेज आहे. दरम्यान दिलजीतने नुकतीच 'नो एन्ट्री २' (No Entry 2) ची ऑफर नाकारली आहे.

२००५ साली आलेला 'नो एन्ट्री' सिनेमा खूप गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांची मुख्य भूमिका होती. याच सिनेमाच्या सीक्वेलची सध्या चर्चा आहे. सीक्वेलमध्ये अर्जुन कपूर आणि वरुण धवन फायनल झाले आहेत. तर दिलजीतलाही सिनेमाची ऑञफऱ मिळाली होती. तोही यासाठी खूप उत्साहित होता. मात्र सिनेमाच्या क्रिएटिव्ह गोष्टी दिलजीतला रुचल्या नाहीत. म्हणूनच त्याने आता सिनेमातून माघार घेतली आहे. अद्याप दिलजीत किंवा सिनेमाच्या मेकर्सने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.  

दिलजीतने हा सिनेमा नाकारल्यानंतर नेटकरी मात्र खूश झालेत. रेडिटवर दिलजीतसाठी अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'त्याने या सिनेमाला होकारच दिला नसता तर बरं झालं असतं','दिलजीतला अशा भूमिका शोभून दिसत नाहीत बरं झालं त्याने नकार जिला.' 

टॅग्स :दिलजीत दोसांझवरूण धवनअर्जुन कपूर