Join us

​ दिलजीत दोसांझ आहे विवाहित; असा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:14 IST

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. होय, दिलजीत विवाहित आहे. कदाचित हे ऐकून  दिलजीतच्या अनेक ...

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. होय, दिलजीत विवाहित आहे. कदाचित हे ऐकून  दिलजीतच्या अनेक तरूणींची निराशा होईल. पण हे खरे आहे. दिलजीत कधीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलत नाही. ‘उडता पंजाब’नंतर दिलजीतच्या चाहत्यांमध्ये भर पडली. अनेकांनी त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण दिलजीत यावर कधीच खुलेपणाने बोलला नाही. एवढेच नाही तर विवाहित असल्याचेही त्याने जगापासून लपवून ठेवले. त्यामुळेच तो विवाहित असल्याचे कुणालाही माहित नव्हते. पण आता  दिलजीतचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याच्या कळतेय. मीडिया रिपोर्टनुसार, दिलजीतचे लग्न धोक्यात आहे. याचे कारण म्हणजे दिलजीतचे बिझी शेड्यूल. दिलजीत सध्या शूटींगधम्ये अतिशय बिझी आहे. इतका की पत्नीलाही वेळ देऊ शकत नाहीय. यामुळे त्याच्यात व त्याच्या पत्नीत वाद विकोपाला गेला असल्याचे कळतेय. शेजा-यांच्या मते, दोघांमध्येही सतत भांडणे होता. त्यामुळे हे नाते लवकरच तुटण्याची शक्यता आहे. अर्थात दिलजीतची पत्नी कोण? हे अद्याप कळलेले नाही. त्याच्या पत्नीचा एकही फोटो समोर आलेला नाही. तिचे नाव काय, ती काय करते, हे केवळ दिलजीतच्या अतिशय जवळच्या लोकांनाच ठाऊक आहे.यापूर्वी अनेक मंचावर दिलजीतला त्याच्या लग्नाबद्दल विचारले गेले, मात्र त्याने कायम या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. दिलजीतच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्याचे कारण हेच आहे.सध्या दिलजीत ‘फिल्लोरी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात तो अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे. अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी दिलजीत ‘उडता पंजाब’मध्ये दिसला होता.