Join us

दिलीपकुमार यांची प्रकृती खालावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:45 IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती ...

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत काहीसी सुधारणादेखील झाली होती. परंतु सायंकाळी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आता देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रु ग्णालयात उपचार सुरु  आहेत. दिलीपकुमार यांचे वय आता ९५ वर्ष असून, या वयात त्यांच्या शरीरावर नवीन औषधांचा प्रयोग करणे शक्य नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे हृदय चांगल्या स्थितीत आहे पण प्रॉसट्रेटचा विकार बळावत चालला असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळीच बातमी आली होती की, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु सायंकाळी पुन्हा दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर आली होती. तेव्हांपासून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आता आलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार यांना होत असलेल्या किडनीचा त्रास अद्यापपर्यंत कमी झालेला नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या किडनीवर उपचार सुरू आहेत. डॉ. जलील पपारकर आणि किडनी स्पेशालिस्ट डॉ. नितीन गोखले त्यांच्यावर यासंबंधी उपचार करीत आहेत. याव्यतिरिक्त इतरही डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.