Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीच्या लग्नाचा फोटो पाहिलंत का?, लाल लेहंग्यात दिसत होती खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:31 IST

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आणि डेनियल वेबर (Daniel Weber) यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. सनी लिओनीने ११ वर्षांपूर्वी याच दिवशी डॅनियल वेबरसोबत लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांसोबत ते खूप वेळ घालवतात. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात डॅनियल वेबर (Daniel Weber) एका फोटोमध्ये पत्नी सनी लिओनीच्या पाठीवर बसलेला दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

बॉलिवूडची हॉट ॲक्ट्रेस सनी लिओनी आणि डेनियल वेबर यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सनीने आपल्या लग्नाच्या दिवशीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी लग्नातील लाल रंगाच्या जोड्यात असून, गुलाबाच्या पाकळ्यांवर डेनियल वेबरसोबत बसली आहे आणि विवाहाचे विधी सुरु आहेत. हा फोटो शेअर करताना तिने त्या क्षणाच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

आमच्या लग्नाला ११ वर्षे झाली. ती वेळ अशी होती की, आमच्याकडे एकही पैसा नव्हता. ५०पेक्षा कमी पाहुणे होते. भेट म्हणून आलेल्या लिफाफ्यातील पैशातून फुले आणावी लागली होती आणि अनेक गोष्टी... अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना तिने डेनियलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. सनी लिओनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’, तमिळ चित्रपट ‘विरमादेवी’सह हिंदी चित्रपट ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे

टॅग्स :सनी लिओनी