Join us

रणवीर सिंगचा रेट्रो लूक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 15:08 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा '८३' सिनेमा चर्चेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा '८३' सिनेमा चर्चेत आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. रणवीर सिंगने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील लूक पाहून हा '८३' चित्रपटातील लूक असल्याचे बोलले जात आहे.

रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की,'रेट्रो लूक.'

 '८३' चित्रपटासाठी खुद्द कपिल देवने रणवीर सिंगला क्रिकेटचे बारकावे सांगितले आहे. इतर कलाकारांबद्दल सांगायचे तर एमी विर्क बलविंदर सिंगची भूमिका करणार आहे. ज्यांनी ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केले होते.

क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. साकीब सलीम ऑल राउंडर मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जे त्यावेळी इंडिया टीमचे उपकर्णधार होते. त्यांची वर्ल्ड कपच्या सेमी फायनल व फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घोषित केले होते.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना निभावणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते. तर निशांत दहिया ऑल राउंडर रोजर बिन्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

१९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी दिग्दर्शनात पदार्पण करतेय. आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.  '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी १५ मे रोजी रवाना होणार आहेत.

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमा