Join us

​ढिंचॅक पूजाचे ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवे गाणे तुम्ही पाहिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 14:15 IST

आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे सोशल मीडियावर नावारूपास आलेली ढिंचॅक पूजा पुन्हा एकदा परतली आहे. होय, तेही तिच्या नव्या गाण्यासह. ढिंचॅक पूजाने ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवे गाणे रिलीज केले आहे

आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे सोशल मीडियावर नावारूपास आलेली ढिंचॅक पूजा पुन्हा एकदा परतली आहे. होय, तेही तिच्या नव्या गाण्यासह.  ढिंचॅक पूजाने ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवे गाणे रिलीज केले आहे. काल युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या गाण्याचा व्हिडिओ आग पसरावी तसा व्हायरल होतो आहे. या गाण्याचा लिरिक्स व्हिडिओ यापूर्वीच रिलीज झाला होता. लोकांना तो प्रचंड आवडला होता. उण्यापुºया २४ तासांत तो व्हिडिओ साडे तीन लाखांवर लोकांनी पाहिला होता. पण आता ढिंचॅक पूजाने याच गाण्याचा व्हिज्युअल व्हिडिओ अपलोड केला आहे.काही दिवसांपूर्वी  ढिंचॅक पूजाच्या  यू-ट्यूब चॅनलवरून तिचे व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते. कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून हे व्हिडिओ तिच्या यूट्युब चॅनेलवरून हटवले गेले होते.   यू-ट्यूबच्या पॉलिसीनुसार, जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता आणि याच पॉलिसीमुळे तिचे व्हिडिओ चॅनेलवरून हटवण्यात आले असल्याची चर्चा होती. तिचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. अर्थात  ढिंचॅक पूजाने याबद्दल अद्यापही कुठलाही खुलासा केलेला नाही. या प्रकरणापूर्वी तिच्यावर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती.  ‘सेल्फी मैंने ले ली आज’ आणि ‘पिंक स्कूटर’ या गाण्यांच्या व्हिडिओमुळे पूजा भलतीच चर्चेत आली होती.   ALSO READ : ​सोशल मीडियावर धूम करणारी ही ‘ढिंचॅक पूजा’ आहे तरी कोण?आपल्या गाण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर टाकून लोकप्रीय झालेली पूजा आता सिंगींगमध्येच आपले करिअर करू इच्छिते. अर्थात पूजाचा आणि गाण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे तिच्या टीकाकारांचे म्हणणे आहे. पण पूजाला यामुळे अजिबात फरक पडत नाही. तिच्या गाण्यांचा सूर आणि ताल याच्याशी काहीही संबंध नाही. कुठलाही गायक सूर-ताल सोडून गातो, तेव्हा त्यास ‘क्रिंज पॉप’ म्हणतात. ‘क्रिंज पॉप’ एक वेगळी श्रेणी आहे. यात गायक स्वत:हून इतके ‘बेसूर’ गातो की, त्याचे गाणे सर्वाधिक खराब व्हावे. अमेरिकेन सिंगर रिबेका ब्लॅक ‘क्रिंज पॉप’ची जनक मानली जाते. तिचे ‘फ्राईडे’ हे गाणे सर्वाधिक खराब गाणे जाहिर करण्यात आले होते.