Join us

शाहिद कपूरचा आगामी चित्रपटातील लूक तुम्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 11:38 IST

पद्मावतच्या यशानंतर शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. सध्या शाहिद बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे.

पद्मावतच्या यशानंतर शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. सध्या शाहिद बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे. या गोष्टीची माहिती स्वत: शाहिद कपूरने सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो शेअर करत दिली. शाहिदने लिहिले आहे की, ''बत्ती गुल मीटर चालूच्या सेटवरचा पहिला दिवस.'' चित्रपट पद्मावतमध्ये  राजाची भूमिका साकारलेला शाहिद आगामी चित्रपट सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तो एका वीज कंपनीच्या विरोधात लढणाऱ्या सामान्य नागरिकाची भूमिकेत दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर शाहिदने शेअर केलेल्या फोटोत तो ब्लॅक कलरच्या जॅकेटमध्ये बाईकवर बसलेले दिसतो आहे या फोटोत शाहिद हँडसम दिसतो आहे. ALSO REDA :  ‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!श्री नारायण सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करित आहे. या आधी त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सारखा सामाजिक विषयावर चित्रपट तयार केला आहे. यात शाहिद शिवाय यामी गौतम आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका आहे. 31 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  श्रद्धा यात एक चुलबुली मुलीची भूमिका साकारणार आहे तर यामी यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. वकिलाची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो हिंदी साहित्यचा अभ्यास करते आहे. यामीने सांगितले, ''पडद्यावर माझी भूमिका खूप मोठी नाही आहे मात्र यासाठी जी तयारी मी करते आहे ती जास्त इंटरेस्टिंग आहे. सध्या मी भाषेवर काम करते आहे आणि त्यासाठी मी हिंदी साहित्याची मदत घेते आहे.''   गेल्या अनेक दिवसांपासून यामी या चित्रपटाचा भाग बनले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्याच कारण होते की यामीने टी-सिरिजच्या सनम रे चित्रपटात काम केले होते. त्यादरम्यान टी-सिरिजच्या मालकासोबत तिचे खटके उडाले होते. टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि पत्नी दिव्या खोसला यामीवर नाराज झाले होते. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा अरोरा आणि टी-सिरीज मिळून करते आहे आणि टी-सिरीजने प्रेरणासमोर अट ठेवली होती की जर यामीने टी-सिरिजची माफी मागतली तरच तिला या चित्रपटात साईन केले जाईल. मात्र यामीने माफी मागितली नाही.